
दुःख हे वाटून घेतलं पाहिजे, आनंद हा अखंडीत ठेवायला हवा
पाचल येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात नाटककार गवाणकर यांचे प्रतिपादन
पाचल :
दहावीचा रिझल्ट लागेल तेंव्हा राजापूर तालुक्यात जो विद्यार्थी पहिला येईल तेंव्हा त्याच्या घरी जाऊन त्याला पाच हजार रोख रक्कम बक्षीस देऊन त्याचा सत्कार करायचा असं सांगताना रिझल्टच्या दिवशी मात्र तालुक्यात दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळालेत बक्षीस विभागून देऊया का? असं सहकाऱ्यांच्या सल्ल्यावर गवाणकर बोलताना म्हणाले की, दुःख हे वाटून घेतलं पाहिजे आणि आनंद हा अखंडीत ठेवायला हवा आणि तो आनंद आज मला या विद्यार्थी आणि तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. असे उदगार नाटककार गंगाराम गवाणकर यांनी पाचल येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात काढले.
राजापूर तालुक्यातील पाचल येथील गुणगौरव सोहळ्यात ते उपस्थितांशी बोलताना आपल्या मनोगतात त्यांनी आठवणीना उजाळा देताना अनेक किस्से सांगितले.
नुकत्याच झालेल्या दहावीच्या निकालात राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ-पाचल, संचालित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय- पाचल या प्रशालेचा कु.अर्थव संदीप मोरे आणि अर्जुना माध्यमिक विद्यालय- कारवली या हायस्कूलची कुमारी आदिती वायबसे या दोघांनी ९८.६० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला.या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा सरस्वती विद्या मंदिर प्रशालेच्या वाडिया सभागृहात गुरवारी 22 मे रोजी सकाळी 10 वाजता पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल या संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे यांच्या अध्यक्षतेखाली व वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल व अर्जुना खोरे विकास मंडळ,कारवली यांच्या संयुक्त विद्यमाने व मिठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येणाऱ्या एका विद्यार्थ्याला पाच हजार रुपये देण्याची घोषणा यापूर्वी गवाणकर यांनी केली होती.
मात्र, दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळविल्याने ही रक्कम विभागून दिली जाईल का?अशी विचारणा झाली यावर बोलताना गवाणकर म्हणाले होतें की, “जाहीर केलेली पाच हजार रुपयांची रक्कम विभागून न देता, दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये देण्यात येतील.” असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होतें बोलल्याप्रमाणे हा सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भर पावसात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्याचे औचित्य साधून पाचल हायस्कुल चे व किसान छात्रालायचे माजी विद्यार्थी कमलाकर पाटील यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बदल त्यांचा गवाणकर साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पाचल हायस्कुल च्या बारावीत तालुक्यात पहिल्या आलेल्या कु.कोमल प्रकाश दाभोळकर 73.83%(विज्ञान शाखा) व कु.प्रीती संदीप प्रभुदेसाई92.33% (कला शाखा) यांचा देखील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल च्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचक्रोशी जेष्ठ नागरिक संस्था मिठगवाने संस्था अध्यक्ष-विलास चेऊलकर, जेष्ठ नाटककार,सल्लागार,वस्त्रहरणकार- गंगाराम गंगाराम,उपाध्यक्ष-एकनाथ आडीवरेकर,सचिव-रमेश राणे,राजापूर तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष-राजन लाड(पत्रकार), स्प्लँश आर्ट्स अकॅडमी जैतापूर संचालक-राकेश दांडेकर,सदस्य विजय मोर्ये,पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,पाचल या संस्थेचे कार्याध्यक्ष-अशोक गंगाराम सक्रे,सरचिटणीस रामचंद्र वरेकर, सहसचिव-किशोरभाई नारकर, संचालक-आण्णा पाथरे,विकास कोलते,सुरेश साळवी गुरुजी, माजी अध्यक्ष-बाबा सावंत,सरस्वती विद्या मंदिर-पाचल शाळेचे मुख्याध्यापक तानाजी देसाईसर, माजी विद्यार्थी फेडरेशन असोसिएशन चे अध्यक्ष-राजू रेडीज, सुशील नारकर, अर्जुना विकास खोरे विकास मंडळ कारवली या संस्थेचे अध्यक्ष-रामचंद्र वरेकर,सरचिटणीस डॉ.विश्वास जाधव,अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवली चे मुख्याध्यापक राजेश तेरवण गुरुजी या कार्यक्रमाचे व्यवस्थापक आणि पत्रकार उमेश दळवी, किसान व कन्या छात्रालय पाचल -अधीक्षक विद्या वाकडे, शैलेश हुंदळेकर सर,सहित शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थितीत होते.