
दापोलीत रो हाऊसमधून भरदिवसा एसी चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
दापोली : तालुक्यातील आसूद येथील ‘ड्रोन व्हिलेज रो हाऊस’मधून भरदिवसा एअर कंडिशनर (AC) युनिटसह चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली., याप्रकरणी अज्ञायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश किसन कातळकर (वय ४०, व्यवसाय-कारपेंटर, रा. सडवे लोहारवाडी, ता. दापोली) हे ८ मे रोजी सकाळी ८ वाजता ‘ड्रोन व्हिलेज रो हाऊस’ या इमारतीची पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना बी ३ बेडरूममधील अंदाजे २०,०००/- रुपये किमतीचे ‘Lloyd’ कंपनीचे पांढऱ्या रंगाचे १ टन क्षमतेचे जुने वातानुकूलित यंत्र (AC युनिटसह) जागेवर नसल्याचे आढळून आले.
अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय हे एसी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.