
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
रत्नागिरी
इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला दि. 19 मेपासून सुरुवात झाली आहे. 21 मे पासून पहिल्या फेरीसाठी प्रत्यक्ष नोंदणी व पसंतीक्रम नोंदविणे, कनिष्ठ महाविलयीं पसंती, कोटा साठी अर्ज या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया 14 जूनपर्यंत ााालणार असल्यो माध्यमिक शिक्षण विभागस्तरावरून सांगण्यात आले आहे.
यंदा विद्यार्थ्यांना एकाच अर्जावर राज्यातील कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत काहीसा बदल करण्यात आला असून तो विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीचा ठरणार आहे. याशिवाय विद्यार्थीसंख्या आणि जागांची उपलब्धता याचाही त्यात ताळमेळ साधला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील 137 कनिष्ठाविद्यालये ऑनलाईन 11 वी प्रवेशासाठी सज्ज झाली आहेत.
या पहिल्या फेराया प्रवेश वेळापत्रकानुसार आज 20 मे रोजी सायं.6 वाजेपर्यंत विद्यार्थी सराव सत्र पोर्टवर सुरू राहणार आहे. यादिवशी मध्यरात्रीनंतर या सत्रात भरलेली माहिती पोर्टलवरून हटविण्यात येणार आहे. त्यानंतर 21 मे रोजी सकाळी 11 ते 28 मेपर्यंत सायं. 6 वा. प्रत्यक्ष नोंदणी व पसंतीक्रम नोंदवणे, 1 ते 10 पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयी पसंती, कोटी (व्यवस्थापन, इन-हाउस, अल्पसंख्याक) साठी अर्ज, प्रत्येक फेरीपूर्वी कन्सेन्ट आवश्यक आहे.
दि. 30 मे ते 1 जून रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत हरकती व दुरूस्ती प्रक्रिया (लॉगिन द्वारे). दि. 3 जून रोजी सायं. 4 वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर. 4 जून रोजी गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी), 6 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रवेश प्रोसस फॉर अॅडमिशन निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व प्रत्यक्ष तपासणी, पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य ओ. दि. 14 जून रोजी रात्री 10 वाजता दुसऱया फेरीसाठी रिक्त जागीं पादी जाहीर होणार असल्यो सांगण्यात आले आहे.
जे विद्यार्थी ण्Aझ् किंवा कोटामार्फत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतात, त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली समजली जाईल. एकदा उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येईल. नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातूनच स्वीकारला जाईल. सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक कोटय़ांतील प्रवेश 6 जून 2025 पासून सुरू होतील.