
लांजा पुनस येथे वृध्द महिलेचा रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू
लांजा : तालुक्यातील पुनस येथील ६२ वर्षीय चंद्रप्रभा चंद्रकांत सुर्वे यांचे १६ मे रोजी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे निधन झाले. याबाबतची माहिती १७ मे रोजी रात्री ११.४१ वाजता लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रप्रभा सुर्वे यांच्या शरीरात रक्ताची कमतरता होती आणि रक्तपेशी कमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. घरी असताना अचानक त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना १०८ ॲम्ब्युलन्सने सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. अमिर पठाण यांनी त्यांना मृत घोषित केले.
चंद्रप्रभा सुर्वे यांच्या निधनामुळे पुनस परिसरात शोक व्यक्त होत आहे.