काम करताना चक्कर येऊन पडलेल्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू
दापोली: तालुक्यातील म्हाळुंग येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला. सिताराम किसन पवार (सध्या रा. म्हाळुंग, दापोली, मूळ रा. भिवंडी, जि. ठाणे) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात १६ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.४० वाजता झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम पवार हे ५ मे रोजी सकाळी ९.०० वाजता दापोली येथील उर्दू शाळा मैदानावर काम करत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने दापोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना ६ मे रोजी दुपारी २.५० वाजता कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
कोल्हापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना ११ मे रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर यांनी दापोली पोलिसांना कळवली. त्यानुसार, दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.