
वाटद येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड-वाटद येथे विनापरवाना गावठी दारुची विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ५४० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत शंकर रहाटे (वय ७९, रा. वाटद परटवणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वृध्दाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित यांनी विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.