
न्यू ईरा इंग्लिश स्कुल सैतवडेचा दहावीच्या शंभर टक्के निकाल
रत्नागिरी : न्यू ईरा एज्युकेशन सोसायटी सैतवडे संचलित न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला आहे. या प्रशालेने गेली अनेक वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित राखली आहे.या विद्यालयातील
महेक जांभारकर हिने प्रशालेत प्रथम 83.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच द्वितीय क्रमांक हाझीरा जांभारकर 77.60 % व 75.80 % गुण मिळवून तृतीय क्रमांक गुहागरकर आयशा पटकाविला.विद्यालयात संख्यात्मक व गुणात्मक दर्जेदार निकाल लागताच सर्व संस्था अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच मुख्याध्यापक इम्रान अंतूले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.