चिपळूणमध्ये उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू
चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी येथील ५९ वर्षीय वृद्धाचा चिपळूणमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिपक रतनराव शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपक शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दिपक शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कोळकेवाडी परिसरात शोक व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.