
खोपीत एकास मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा
खेड : तालुक्यातील खोपी-रोहिदासवाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होवून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वासुदेव सुतार (रा. मिर्ले-वडाचीवाडी) व एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
सुनील आत्माराम भोसले (५३, मिर्ले-हुंबरवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ते मिर्ले-हुंबरवाडी ते खोपी पायी जात असताना संशयितांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केलीस तर तुझ्या मोठ्या भावासारखीच अवस्था करेन, पैसे वगैरे देणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर हातातील लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यांत मारहाण केली. पनवेल येथे नेवून ठार मारू, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.