
खेडशी येथील वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी : शहरानजिकच्या खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉज येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत चार मुलींची सुटका केली. ही कारवाई मंगळवार दि. 13 मे रोजी रात्री 8.45 ते 9.50 वा. कालावधीत करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलीसांनी त्या ठिकाणी धाड टाकत ही संयुक्त कारवाई केली.
या कारवाईत मुंबई आणि सुरत येथील चार मुलींची सुटका करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत लॉज चालकविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.