दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत
सैतवडे केंद्रातही मॉडेलची कु. तन्वी बळकटे प्रथम
रत्नागिरी:
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला आहे. या प्रशालेने गेली अनेक वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित राखली आहे.या विद्यालयातील
तन्वी बळकटे हिने प्रशालेत व केंद्रात प्रथम 87.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच द्वितीय क्रमांक रिया पावसकर 81.60 % व सागर केसरकर 81.40 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.विद्यालयात संख्यात्मक व गुणात्मक दर्जेदार निकाल लागताच सर्व संस्था पदाधिकारी, तसेच मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.