संगमेश्वरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने प्रौढाचा मृत्यू
संगमेश्वर : तालुक्यातील माखजन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रवींद्र चव्हाण (५०, रा. कळंबुशी अलेटीवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल ९ मे रोजी सकाळी ९:१५ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र चव्हाण यांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आणि ते मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत होते. सुमारे २० दिवसांपूर्वी ते कळंबुशी गावी आराम करण्यासाठी आले होते. 9 रोजी सकाळी ते अंगणात झाडलोट करत असताना अचानक बांधावरून खाली पडून बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने माखजन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.