
लग्नाचे आमिष दाखवून संबंध; आरोपीची निर्दोष मुक्तता
चिपळूण : लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध ठेवून ३.३२ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी राजेश पवार याची निर्दोष मुक्तता केली.
२०१६ साली चिपळूण तालुक्यातील एका विवाहित महिलेने चिपळूण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत, आरोपीने लग्नाचे वचन देत वारंवार संबंध ठेवले व जेसीबी खरेदीच्या नावाखाली रक्कम घेतल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात जेसीबी खरेदीचा कोणताही दस्तऐवज किंवा व्यवहाराचा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नाही. तसेच कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही उपस्थित करण्यात आलेला नाही.
या प्रकरणात आरोपीच्या तर्फे ॲड. फारुक म्हातार नाईक यांनी सर्व पुरावे न्यायालयासमोर मांडून युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून आरोपी निर्दोष असल्याचे नमूद करत त्याची मुक्तता केली.