हातखंबा- गिरदा येथील जंगलमय भागात अनोळखी मृतावस्थेत
रत्नागिरी ः हातखंबा-बोबंलेवाडी गिरदा येथील जंगलमय भागात अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हातखंबा पोलिस पाटील गणपत डांगे (रा. हातखंबा-डांगेवाडी) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. हातखंबा बोबलेवाडी गिरदा येथे एक अनोळखी पुरुष मृतावस्थेत पडलेला आहे. पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा केला. त्याचे वय ४० ते ४५ वर्षाचे आहे. नावगाव समजून येत नाही. तसेच अनोळखी हा चार ते पाच दिवसापुर्वी मयत झालेला आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.