वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या विरुद्ध गुन्हा
रत्नागिरी,ः तबरेज चौक ते नाटे (ता. राजापूर) जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्नार इस्माईल भाटकर (वय ४९, रा. जाबांरी, सागवे, ता. राजापूर) असे संशयित वाहन चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास तबरेज चौक ते नाटे जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मन्नार भाटकर याने मोटार (क्र. एमएच-०४ सीझेड ८२८०) ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच वाहनांना धोका होईल अशी रस्त्यावर पार्क केली. या प्रकरणी पोलिस शिपाई सुरेश कुसाळे यांनी नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.