दापोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयात एका २८ वर्षीय तरुणाने झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ मे रोजी सायंकाळी १६.५३ वाजता घडली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मृतकाचे नाव अशोक पर्णचंद्रा सिंग असून तो ओडिशा राज्यातील बालसोरे जिल्ह्यातील बडापालचा रहिवासी आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.