
गुहागरमध्ये वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
गुहागर: तालुक्यातील निगुंडळ आडेवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलीप राधो शिगवण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ०३ मे रोजी पहाटे १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या घटनेची माहिती मृतकाच्या भावजयीने दिली. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्या घरी असताना शेजारी राहणाऱ्या त्यांच्या जाऊ लक्ष्मी यांच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्या त्यांच्या घरी गेल्या असता, लक्ष्मीने सांगितले की त्यांचे पती दिलीप शिगवण यांनी आज पहाटे १ ते ३ च्या दरम्यान अज्ञात कारणावरून घराच्या वरच्या मजल्यावरील लाकडी छपराच्या भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला.
या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात आज सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.