दापोली असोंड येथे ७० वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
दापोली : तालुक्यातील असोंड येथे एका ७० वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शंकर भिकु पवार असे त्यांचे नाव आहे. ही घटना ०३ मे सकाळी १० वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर पवार यांनी त्यांच्या राहत्या घरातील माळ्याच्या जिन्याच्या रेलिंगला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.