
दुकानात रॅकवर ठेवलेल्या मोबाईलची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद
खेड : खेड शहरातील गांधीचौकात असलेल्या कल्याणी स्टोअर्समध्ये आज (०२ मे २०२५) दुपारी १ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केली. या अज्ञात चोरट्याने दुकानात रॅकवर ठेवलेला एका महिलेचा विवो कंपनीचा सुमारे ७ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला.
या घटनेची तक्रार सायंकाळी ७ वाजून ९ मिनिटांनी खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादीनुसार, गुलाबी रंगाचा शर्ट आणि डोक्यात निळ्या रंगाची टोपी घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या परवानगीशिवाय आणि फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा मोबाईल चोरला.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्यामुळे अज्ञात चोरटा लवकरच पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला या वर्णनाच्या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.