महामार्गावर आरवली घाटात बिबटयाचा मृत्यू
अज्ञात वाहनाची धडक
संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली घाटात बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बिबट्या रात्री महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी महामार्गावर पडलेल्या बिबट्याचा मृतदेह गावचे सरपंच निलेश भुवड, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी पोलीस पाटील मेने तसेच नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
सकाळी घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर वन विभाग अधिकारी उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.