
विनापरवाना दारु बाळगणाऱ्या संशयितावर गुन्हा
रत्नागिरी : शहरातील परटवणे तिठा येथे विनापरवाना दारु बाळगल्याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील महादेव चरकरे (४७, रा. नरबे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २० हजार रुपयांचा विदेशी दारुचा मद्यसाठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला. यामध्ये मॅकडॉल व्हिस्की कंपनीच्या १८० मिलीच्या ४८ बाटल्या, बॅकपायपर व्हिस्कीच्या ४८ बाटल्या, इम्पेरिअल ब्ल्यु व्हिस्कीच्या १२ बाटल्या, तसेच इतर विदेशी मद्याच्या बाटल्या पोलिसांकडून हस्तगत करण्यात आल्या.