
तेजससह जनशताब्दी आजपासून दादरपर्यंत
खेड
सीएसएमटी मुंबई स्थानकातील फलाट क्र. १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे ३० एप्रिलपर्यंत घेण्यात आलेला ‘ब्लॉक’ संपुष्टात आला आहे. त्यामुळे १ मे पासून मडगाव-सीएसएमटी. तेजस एक्सप्रेससह मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी दादर स्थानकाऐवजी सीएसएमटी स्थानकापर्यंत धावतील.
सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी शिमगोत्सवापासून सीएसएमटी स्थानकात सातत्याने ‘ब्लॉक’ घेण्यात येत आहे. आतापर्यंत सलग तीनवेळा १५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला. यामुळे मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस ३० एप्रिलपर्यंत सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकापर्यंत चालवण्यात आली.
मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेसही ३० एप्रिलपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत धावत होती.