
लवेलनजीक अपघातात दोघे जखमी, ट्रकचालकावर गुन्हा
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लवेलनजीक चुकीच्या बाजूने येवून ज्युपिटर दुचाकीला धडक देत झालेल्या अपघातात दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालक सागर विठ्ठल पठाडे (२९, येवला-नाशिक) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश गणपत चाळके, अर्चना अंकुश चाळके (दोघेही रा. पिरलोटे-विठ्ठलवाडी) अशी जखमींची नावे आहेत. अंकुश चाळके हे दुचाकीने (एम.एच.०८/ए.डब्ल्यू. ५७९६) पिरलोटे-विठ्ठलवाडी येथून खेड असा प्रवास करत होते. याचवेळी १६ टायरचा ट्रक (एम.एच.१५/एच.एच.७५८७) चुकीच्या बाजूने येवून दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या. या बाबत राजन श्रीराम चाळके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीं.