
लोटेमध्ये ३५ हजाराचा ऐवज हस्तगत
खेड: लोटे औद्योगिक वसाहतीतील अक्विला ऑरगॅनिक ग्रा.लि. कंपनीच्या गोदामामधून झालेल्या चोरीप्रकरणातील साहित्य पसार संशयिताच्या लवेल येथील घराजवळून ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेतील प्रतीक राजेंद्र कदम (२४ माणी-देऊळवाडी, खेड), आकाश शिवाजी भोसले (२७ रा., चिपळूण) या दोघांची २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत स्वानगी करण्यात आली आहे.
अॅक्विलाच्या गोडाऊनमधून झालेल्या साहित्य चोरीप्रकरणी दत्तात्रय शिवाजी गोडसे (२४, रा. नरळेवस्ती-सांगोला), सुरज रामसिंहजीवन चौहान (२८, असगणी-खेड) अटक करण्यात आली असून हे देखील पोलीस कोठडीतच आहेत. या प्रकरणात सचिन चव्हाण (लवेल) हाच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.