रेल्वेस्टेशन अपघातप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा
अपघातप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा
रत्नागिरी : रेल्वेस्टेशन ते रेल्वेफाटा असे जाणाऱ्या वृद्ध पादचाऱ्याला रिक्षाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संशयित रिक्षाचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश केरू मोहिते (रा. शिळ, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) दुपारी रेल्वेस्टेशन ते रेल्वेफाटादरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलत सासरे चंद्रकांत राजाराम सुर्वे (वय ६६, मूळ रा. तुळसणी, ता. संगमेश्वर, मूळ : भांडूप (वेस्ट), मुंबई) हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे चालत जाताना संशयित रिक्षाचालक राजेश मोहिते याने चंद्रकांत सुर्वे यांना धडक दिली. या अपघातात सुर्वे यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ते रेल्वेफाटा असे जाणाऱ्या वृद्ध पादचाऱ्याला रिक्षाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संशयित रिक्षाचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश केरू मोहिते (रा. शिळ, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) दुपारी रेल्वेस्टेशन ते रेल्वेफाटादरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलत सासरे चंद्रकांत राजाराम सुर्वे (वय ६६, मूळ रा. तुळसणी, ता. संगमेश्वर, मूळ : भांडूप (वेस्ट), मुंबई) हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे चालत जाताना संशयित रिक्षाचालक राजेश मोहिते याने चंद्रकांत सुर्वे यांना धडक दिली. या अपघातात सुर्वे यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.