हातखंबा डांगेवाडी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी : हातखंबा डांगेवाडी येथील रहिवासी असलेले ५९ वर्षीय सनिल सखाराम डांगे यांचा बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनिल डांगे हे अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. बराच वेळ ते बाहेर न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. आत पाहिल्यावर ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांना तातडीने उपचारासाठी लोटलीकर हॉस्पिटल, रत्नागिरी येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.