अजित पवारांच्या दौऱ्यात मधमांशाचा हल्ला; ताफ्यातील पोलीस अन् कर्मचाऱ्यांना चावा
▪️कसबा येथील घटना
संगमेश्वर:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या या दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने एकच धांदल उडाली.अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे अजित पवार मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज संगमेश्वर दौऱ्यावर होते, त्यांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने एकच धांदल आणि धावपळ उडाली.कसबा संगमेश्वर येथे मशमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अजित पवारांच्या ताफ्यातील अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.
संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हा हल्ला केला.मधमांशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे ताफ्यातील अनेकांची पळापळ झाली, काहींनी तोंड झाकण्यासाठी गमछा, उपरणे वापलरल्याचं दिसून आलं.मधमांशा उठताच गाडीत बसण्यासाठी सर्वांची एकच धावपळ केली होती. काहींनी हाताने मधमाशांना झटकण्याचा प्रयत्नही केला.