संगमेश्वरमध्ये वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ येथे एका व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला. अशरफ अली शहा (वय ६०, सध्या रा. रामपेठ संगमेश्वर, मूळ रा. आरो, पोस्ट नैरीया, ता. लालगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी पहाटे ३.३० वाजेच्या पूर्वी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफ अली शहा हे रामपेठ येथे श्री. विठोबा कांदळगावकर यांच्या घरी भाड्याने राहत होते. त्यांच्या खोलीच्या बाहेर त्यांनी उलटी केली आणि तेथेच जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.