राजापुरात बसची ट्रकला धडक; सुदैवाने जीवितहानी नाही
राजापूर : राजापूर आगाराच्या एस.टी. बसने भरधाव वेगात एका ट्रकला मागून धडक दिल्याची घटना ओणी पेट्रोल पंपा समोरील रोडवर घडली. ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी एस.टी. बस चालक श्रीकृष्ण सहदेव खाकरे (वय ४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती वाहतूक निरीक्षक स्वप्नील शंकर कदम (३३, रा. साखळकरवाडी, राजापूर, मूळ रा. नरसोचा गल्ली, ता. तासगांव, जि. सांगली) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. कदम हे राजापूर एस.टी. आगारात वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकृष्ण खाकरे हा राजापूर आगाराची एस.टी. बस (क्र. MH 09 FL 1075) घेऊन जात होता. वाटुळ तांबळवाडी फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास त्याने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात गाडी चालवत असताना त्याच्या पुढे जाणाऱ्या टाटा १६१६ ट्रक (क्र. GA 04 T 7283) ला मागच्या बाजूने धडक दिली.
या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.