
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अभाविप रत्नागिरीचे निषेध आंदोलन
रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरीच्या वतीने २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निर्दयतेने मारले गेलेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ही श्रद्धांजली तसेच निषेध निदर्शने रत्नागिरीतील जयस्तंभ चौक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध केला. यावेळी अभाविप नगर मंत्री सई कान्हेरे, शहर सहमंत्री सुमित पाध्ये व योगेश कांबळे तसेच कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.