
उंदीर मारण्याचे औषध प्यायल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
लांजा : तालुक्यातील एका महिलेने राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध घेतल्याने उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला. १८ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजता ही घटना घडली. महिलेवर लांजा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
महिलेने कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, याचा तपास लांजा पोलीस करत आहेत. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.