
शहरातील एकतामार्ग येथील मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी, ः शहरातील एकता मार्ग येथील नाना-नानी पार्कच्या जवळ रस्त्याच्या बाजूला बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. साहील रवींद्र पवार (वय २८, रा. खेडेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता १९) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाना-नानी पार्क येथे विनापरवाना मटका जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे मटका जुगाराच्या साहित्यासह ९ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.