
रेल्वेसह रिक्षा प्रवासात सोन्याची चेन पळविली
रत्नागिरी ः रेल्वेच्या कोकणकन्या मेल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या गळ्यातील ९२ हजाराची चेन चोरट्याने चोरली. लांजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १५) ते बुधवारी (ता. १६) सकाळी साडेसहाच्या सुमारास दादर ते विलवडे रेल्वेस्टेशन-रिंगणे गाव दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रमाकांत गणपत आयरे (वय ५६, रा. के. डी. रोड मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले पश्चिम मुंबई-५६) हे कोकणकन्या मेल एक्स्प्रेस च्या बोगीतून प्रवास करत होते तसचे विलवडे रेल्वे स्टेशन ते रिंगणे गाव असा रिक्षाने प्रवास करत असताने त्यांची ९२ हजार रुपयांची सोन्याची चेन चोरट्याने लांबविली. या प्रकरणी रमाकांत आयरे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.