ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न
रत्नागिरी : आज रत्नागिरी येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना सभासद नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा झाली. रत्नागिरी जिल्हा सभासद नोंदणीत आघाडीवर असावा यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने पूर्ण ताकदीनिशी काम करावे, असे आवाहन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत. त्यांच्या विचारांचे घराघरात प्रसारण व्हावे यासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे, असे आवाहन या निमित्ताने मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.

या प्रसंगी माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश मुकादम, विपुल कदम,राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, विलास चाळके, महिला विभाग जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, राजेश बेंडल, अण्णा कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, संदीप सावंत, अमरदीप परचूरे यांच्यासह शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.