फार्महाऊसमधील दागिने चोरीप्रकरणी दोन संशयितांची जामिनावर सुटका
खेड
तालुक्यातील आंबडस येथील ग्रीनव्हिला फार्महाऊसमध्ये झालेल्या १ लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या सिद्धेश एकनाथ उतेकर (२७, कुरवळजावळी-आखाडवाडी), रचना राजेंद्र भोसले (३२, मूळ गाव चोरवणे- गडकरवाडी) यांची येथील प्रथम वर्ग न्यायालयाने जामिनावर सुटका केली. संशयितांच्यावतीने ॲड. अश्विन भोसले यांनी काम पाहिले.
संतोष रमेश शितोळे (लवळे-मुळशी, पुणे) यांनी ग्रीनव्हिला फार्महाऊसमधील १०५ नंबरच्या खोलीत प्रवेश करून बॅगेतील १ लाख ५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही संशयितांना गजाआड केले होते.. दोन्ही संशयितांना दोनवेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दुसऱ्यांदा सुनावलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आल्यानंतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.