सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः जिल्हा उद्योग केंद्राच्या पडिक इमारतीच्या आवारात व पोमेंडी बुद्रुक येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हुसेन शेखासन (वय ४५) व समीर विजय चाळके (वय ३८) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता. १५) साडेपाच ते साडेसातच्या सुमारास जिल्हा उद्योग केंद्राच्या पडिक इमारत तसेच पोमेंडी बुद्रुक येथील सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे व पोलिस हवालदार विनोद भितळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन दोन संशयितांविरुद्ध शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.