MSCIT आता आपल्या दारात आपल्या गावात
रत्नागिरी : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे यांच्या आय टी लॅबला नुकतीच *MSCIT* कोर्स शिकवण्याचे लायसन्स भेटले आहे. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र टेक्निकल बोर्ड यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा गेली 20..22 वर्ष सुरु असणारा अत्यंत महत्वाचा *MSCIT* हा कोर्स प्रत्येकाला करणे हे गरजेचे आहे तसेच सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी साठी हा कोर्स करावाच लागतो.
आपल्या गावांतील आणि परिसरातील मुलांना या आधी हा कोर्स करायला खंडाळा किंवा रत्नागिरी जावे लागतं असे. त्यांना जाणे येणे त्रासदायक असेच परंतु अफाट खर्च सुद्धा होतो हेच ओळखून मुस्लिम एजयुकेशन सोसायटी ने दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथे आय टी लॅब सुरु केली. आणि संस्थेचे सेक्रेटरी आणि शाळेचे क्लार्क *रुमान पारेख* यांनी *MSCIT* ची अत्यंत जटील आणि किचकट रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करून आपल्या या आय टी सेंटर मध्ये मोफत MSCIT चे लायसन्स महाराष्ट्र शासनाकडून रजिस्टर करून घेतले.
या मोलाच्या कामात त्यांना रत्नागिरी तील प्रगती कंप्युटर्स चे व्यवस्थापक *वैभव वझे* यांची मोलाची मदत मिळाली. तसेच या साठी संस्थेचे अध्यक्ष *श्री रहीम माद्रे साहेब* उपाध्यक्ष *श्री अजिज माद्रे साहेब* तसेच इतर पादाधिकारी आणि आय टी लॅब उभी कारण्यासाठी खारीचा वाटा असलेले *श्री मुसा अली पागरकर* साहेब व शाळेचे मुख्याध्यापक *श्री कोळेकर सर* यांचे मोलाचे साहाय्य भेटले.
आता di मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथे *MSCIT* ऍडमिशन्स ला सुरुवात झालेली आहे. परीसरातील विद्यार्थी, तरुण, गृहिनी आणि सर्वांनीच या कोर्स ला लाभ घ्यावा असे आवाहान संस्थेने केले आहे.