रत्नागिरी : भंडारवाडी येथे उघड्या घरातून १२ हजारांचे वेल्डिंग साहित्य चोरीला
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील खेडशी भंडारवाडी येथे एका उघड्या घरातून अज्ञात चोरट्याने १२ हजार १०० रुपये किंमतीचे वेल्डिंगचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २६ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २७ जून २०२४ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी चेतन चंद्रकांत भवड (वय ३२) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन भवड यांचे वेल्डिंगचे काम सुरू असलेल्या उघड्या घराच्या एका खोलीत पत्र्याच्या पेटीत कुलूप न लावता वेल्डिंगचे साहित्य ठेवले होते. अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेत घरात प्रवेश केला आणि पेटीतील ५ हजार रुपये किंमतीची ग्रेट यचा कंपनीची २०० एम्पीयरची वेल्डिंग मशीन, १५०० रुपये किंमतीची डि वॉल्ट कंपनीची पाच इंची इलेक्ट्रिक ग्रायंडर, १००० रुपये किंमतीचे पॉश कंपनीचे इलेक्ट्रिक ग्रायंडर, १००० रुपये किंमतीची बॉस कंपनीची ड्रिल इलेक्ट्रिक मशीन, १५०० रुपये किंमतीची गोल्ड स्टार कंपनीची इलेक्ट्रिक रोटरी हॅमर ड्रिल मशीन, १००० रुपये किंमतीची ३५ मीटर इलेक्ट्रिक दोन वायरची पायर, १०० रुपये किंमतीचे दोन लोखंडी हातोडे, ६०० रुपये किंमतीची चार लोखंडी बिट ड्रिल मशीन आणि ४०० रुपये किंमतीची एक जुनी पत्र्याची पेटी, असा एकूण १२ हजार १०० रुपयांचा माल चोरून नेला.
या चोरीची तक्रार १५ एप्रिल २०२५ रोजी दाखल करण्यात आली असून, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या चोरीचा अधिक तपास करत आहेत.