रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी महिलेचा मृत्यू
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील श्री रामनाथ हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना १५ एप्रिल सकाळी १०.१० वाजता घडली. ही महिला गेल्या १२ वर्षांपासून मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला छातीत दुखत असल्याने तिने शेजारी राहणाऱ्या मयुरी सागवेकर यांना सोबत घेऊन मारुती मंदिर येथील डॉ. अनिरुद्ध फडके यांच्या दवाखान्यात गेली. दवाखान्याच्या समोर पोहोचताच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. डॉ. फडके यांनी तिला तातडीने डॉ. लोटलीकर यांच्या श्री रामनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला औषधोपचारापूर्वीच मृत घोषित केले.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.