डीएनबी जेनरल मेडिसिन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परकार हॉस्पिटलला मान्यता
वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातले पुढचे पाऊल
रत्नागिरी
पदव्युत्तर अभ्यासक्रम डीएनबी जेनरल मेडिसिन या अभ्यासक्रमासाठी रत्नागिरीच्या परकार हॉस्पिटलला नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सची मान्यता मिळाली आहे. कोकणातील हे पहिले हॉस्पिटल आहे ज्याला ही मान्यता मिळाली, ही आपल्यासाठी मानाची गोष्ट आहे. परकार हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या डॉ. कल्पना मेहता आणि डॉ शिरीष शेणई यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. प्रत्येक वर्षी २ विद्यार्थीची निवड पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी होणार आहे.
हॉस्पिटलच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातले हे पुढचे पाऊल आहे ज्याने रुग्णांना पण फायदा होईल. परकार हॉस्पिटल गुणवत्तेवर भर देणारे असून हा हॉस्पिटलच्या वाटचालीचा पुढचा टप्पा असेल.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स ही ” आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार ” ची एक स्वायत्त संस्था आहे १९७५ साली नवी दिल्ली येथे त्याची स्थापना झाली. या अंतर्गत एमबीबीएसनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम डीएनबी, फेलोशिप, डिप्लोमा, डेंटल संदर्भातले अभ्यासक्रम घेतले जातात. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय गुणवत्ता यादीतून होते.