मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा
पावस ः तालुक्यातील गोळप-धोपटवाडी एसटी बस स्टॉप पिकअप शेडच्या मागील बाजूला कातळावर मद्यपान करणाऱ्या प्रौढा विरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश कृष्णा राडये (वय ५२, रा. राड्येवाडी, घाणेकरवाडी-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १३) रात्री सव्वा आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हे गोळप धोपटवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हवालदार निखिल साळवी यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.