कशेळी -तेलीवाडी येथील बेपत्ता तरुण मृत स्थितीत आढळला..
रत्नागिरी ः घरातून कुणालाही न सांगता गेलेल्या तरुणाचा मृतदेह कशेळी (ता. राजापूर) समुद्र किनारी कुसगे येथे समुद्राच्या पाण्यात तरंगताना मृत स्थितीत आढळला. प्रतिक तुकाराम आंबेकर (वय २८, रा. कशेळी तेलीवाडी, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ही घटना शनिवारी (ता. १२) रात्री साडेआठच्या सुमारास कशेळी समुद्र किनारी कुसगे येथे समुद्राच्या पाण्यात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक हा घरात कुणालाही न सांगता शुक्रवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास निघून गेला होता. त्याचा शोध घेतला असता शनिवारी तो कुसगे येथील समुद्राच्या पाण्यात मृत स्थितीत आढळला. या प्रकरणी नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.