
लांजात गोवा महामार्गावर टेम्पो रस्त्यात उभा करून वाहतुकीस अडथळा; चालकावर गुन्हा
लांजा: लांजा तालुक्यातील कोले फाटा येथे गोवा महामार्गावर एका टेम्पो चालकाने आपला वाहन रस्त्यात उभे केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. ही घटना ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. याप्रकरणी लांजा पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रईस महंमदअक्रम मणियार (वय ४२) याने त्याच्या मालकीचा अशोक लेलैंड कंपनीचा छोटा दोस्त टेम्पो (क्र. एम.एच.०८ ए.पी २९०६) हा मंचई गोवा हायवे रोडवर कोले फाटा येथे रस्त्यात उभा केला होता.
टेम्पो महामार्गावर अशा प्रकारे उभा केल्याने हायवेवरून ये-जा करणाऱ्या लोकांना आणि वाहनांना धोका निर्माण झाला होता. तसेच, यामुळे वाहतुकीसही मोठा अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि टेम्पो बाजूला करण्याची व्यवस्था केली.
सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने आणि वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत वाहन उभे केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी आरोपी रईस महंमदअक्रम मणियार याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ (सार्वजनिक मार्गावर उपद्रव निर्माण करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.