टॅरिफ धोरणाचा कोळंबीला फटका
दर ७० रुपये किलोपर्यंत गडगडले
दापोली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी टॅरिफ लावलं आणि जगभरातले शेअर बाजार गडगडले. या वाढलेल्या टॅरिफ रेटमुळे फक्त शेअर मार्केटच नाही तर कोकणातल्या मत्स्य व्यवसायावरही झाला आहे. अमेरिकेत कोळंबीची सर्वाधित निर्यात भारत देशाकडून होते, पण नव्या टॅरिफ धोरणांमुळे विशेषतः कोकणातील मच्छीमार हवालदिल झाला आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील कोळंबीचे दर तब्बल 80 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे 350 रुपये प्रती किलो दराने विकली जाणारी कोळंबी ही 70 रुपयांपर्यंत घसरली आहे, तर अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे निर्यातीदरम्यान पूर्वीच्या 6 टक्क्यांऐवजी 26 टक्के कर भरावा लागणार आहे. यामुळे मासळी व्यवसाय चांगलाच कोंडीत सापडला आहे.
कोळंबीमुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदराला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते, तर भारतातील कोळंबी जगात सर्वात जास्त आयात करणारा देश हा अमेरिका आहे. त्यात काही विशिष्ट जातीच्या कोळंबीला मागणी जास्त असते. मात्र, ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरणामुळे कोळंबी व्यवसायास घरघर लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील अर्थकारण चांगलेच मंदावले आहे.