नारायण राणे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात मंत्री उदय सामंत यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव
देवरुख: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी आज देवरुख येथे मोठी गर्दी झाली होती. या सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणे यांच्या संघर्षमय राजकीय जीवनाचा गौरव केला. ते म्हणाले, “संघर्षाची व्याख्या म्हणजे नारायणराव राणे साहेब. त्यांनी कोकणच्या विकासासाठी कायमच संघर्ष केला आहे. कोकणचे सुपुत्र म्हणून त्यांनी या भागासाठी मोठे योगदान दिले आहे.” मा. ना. उदयजी सामंत यांनी तमाम कोकणवासियांच्या वतीने राणे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात राणे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, राणे साहेबांनी आपल्या आगळ्या-वेगळ्या राजकीय शैलीने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाला आपली ओळख करून दिली आहे. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक आठवणी उपस्थितांसोबत सामायिक केल्या. राणे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अल्पशा कार्यकाळात कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये झालेल्या विकासकामांची आठवण त्यांनी विशेषत्वाने सांगितली.
याप्रसंगी मंत्री उदय सामंत यांनी राणे साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने भविष्यातही अशीच सामाजिक आणि राजकीय सेवा घडत राहो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सौ. नीलमatai राणे, मंत्री नितेशजी राणे, आमदार निलेशजी राणे, आमदार शेखरजी निकम यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्याने देवरुखमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.