नाखरे येथील मद्यपान करणाऱ्या वृद्धावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील नाखरे-बौद्धवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव गोविंद जाधव (वय ६५, रा. नाखरे-बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३०) रात्री सव्वा आठच्या सुमारास बौद्धवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विदेश दारुचे मद्यपान करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.