वैभवी पाटणे न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलनावर ठाम
बारा दिवस आंदोलन; वन विभागाकडे आरोपींचा कबुलीनामा
खेड :
तालुक्यातील मिर्ले गावातील देवरहाटीमधील झाडे तोडून मंदिर जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न तत्काळ थांबवून दोषीं विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत मौजे खोपी तांबडवाडी येथील वैभवी विजय पाटणे यांनी खेड तहसीलदार कार्यालय आवारात १८ रोजी पासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन त्यांनी बाराव्या दिवशीही सुरू ठेवले आहे. तहसीलदार सुधीर सोनवणे सरकारी मंदिर तोडून जबरदस्तीने अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करे पर्यंत मी ठिय्या आंदोलन करणार आहे, असे त्या म्हणाल्या.
मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत पोलिस व प्रशासन विरोधातील ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्यात येईल. मौजे मिर्ले येथील भूमापन क्रमांक/उपविभाग ८४ क्षेत्र १-२९-०० या जमीन मिळकतीमध्ये ग्रामदेवता झोलाई देवीच्या मूर्त्या मूळ जागेवर होत्या तशा बसवणे, देवरहाटी मधील जी झाडे तोडली व विकली त्या बाबत संबंधित १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. ग्रामदेवता झोलाई देवीच्या जीर्णोध्दाराठी सर्व प्रकारच्या शासन परवानगी घेऊन करण्यात याव्यात. त्याचबरोबर ६ गावातील सर्व समाजातील लोकांचा सहभाग घेऊन धर्मदाय आयुक्त रत्नागिरी यांच्याकडे ट्रस्ट नोंदवून ग्रामदेवता झोलाई देवीला मिळणाऱ्या दानाची रक्कम ट्रस्ट च्या बँकेत खाते उघडून जमा कराव्यात, अशा मागण्या पाटणे यानी केल्या म्हणाल्या, आहेत.
जो पर्यंत दि. २६ जानेवारी रोजी मी सुरू केलेल्या उपोषण प्रसंगी माझ्यावर जबरदस्ती करून उपोषण सोडण्यास भाग पाडणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी व पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्यावर जो पर्यंत कारवाई होत नाही व वन विभाग व पोलिस यांचे वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाहीत, तो पर्यंत मी ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार आहे, असे पाटणे यांनी सांगितले.