
रेल्वेत चढत असाताना मोबाईल लांबवला
रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे रेल्वेत चढत असाताना अज्ञाताने वृध्दाचा 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. ही घटना शनिवार 22 मार्च रोजी रात्री 8.30 वा. सुमारास घडली.
याबाबत दिलीप रामनाथ धारिया (63) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,शनिवारी रात्री दिलीप धारिय हे रत्नागिरी रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्म 3 वर तेजस एक्सप्रेसची बोगी सी4 मध्ये प्रवाशांच्या गर्दीमध्ये चढत होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल काढून चोरुन नेला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.