
पोलवर काम करताना तरुणाला लागला शॉक
रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील तरुण इलेक्ट्रीक पोलवर काम करत असताना त्याला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. इमाम सलीम शेजसुंदी (वय २२, रा. करबुडे, रत्नागिरी) ही घटना रविवारी (ता. २३) दुपारी बाराच्या सुमारास शहरानजीकच्या कुवारबाव येथील इलेक्ट्रीक पोलवर काम करत असताना त्याला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्याला सोडण्यात आले. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली.