
‘टुडी इको’ शिबिरात ६७ मुलांची तपासणी
उदय सामंत प्रतिष्ठान; आठ जणांवर करावी लागणार शस्त्रक्रिया
रत्नागिरी, : उदय सामंत प्रतिष्ठान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित मोफत २ डी इको कॅम्पमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ मुलांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी मुंबईतील बालाजी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. श्रीपाल जैन यांची उपस्थित होते.
रत्नागिरीत झालेल्या या शिबिरात १५ दिवसाच्या बाळापासून १५ वर्षाच्या मुलाची २ डी इको तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर १८ मुलांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार असून ८ मुलांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. पुढील उपचाराचे नियोजन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे. वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन डॉ. रामनंदन आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनी लहान मुलांना चॉकलेट वाटप केले. तसेच पालकांशी संवाद साधला. आतापर्यंत प्रतिष्ठानतर्फे लहान मुलांसाठी २ डी इको तपासणीची एकूण ५ शिबिरे आयोजित केली होती. त्यामधून सुमारे ४५५ मुलांची तपासणी केली असून ४१ सर्जरी करण्यात आल्या. प्रतिष्ठानतर्फे आयोजित कॅम्पमध्ये नेहमीच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले जाते आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होतो.